Namo Shetkari Nidhi Yojana : महाराष्ट्र शासनाने 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे 6000 रुपयाची भर टाकून, राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांची मिळून एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषित केले होते.
महाराष्ट्र मध्ये 2023-24 च्या अर्थसंकल्पात जारी केलेले या योजनेला “नमो शेतकरी महासन्मान निधी” असे नाव देण्यात आले. नमो शेतकरी महासन्माननिधी योजना घोषित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.