Talathi Bharti Hall Ticket : तलाठी भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल 13 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत 4000 जागांसाठी आलेले एवढे अर्ज पाहता महसूल विभागाकडून परीक्षेसाठी मोठे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल 19 दिवस चालणार आहे.
13 लाखापेक्षा जास्त उमेदवारांची परीक्षा घेण्याचे मोठे काम TCS कडून करण्यात येणार आहे. परीक्षेसाठीच्या तारखा महसूल विभागाने जाहीर केल्या असून यासाठी 19 दिवस परीक्षा महसूल विभागाकडून घेतली जाणार आहे. सदर परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये असणार आहेत.
या सर्व परीक्षा वेगवेगळ्या तीन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या असून सकाळी 9.00 ते 11.00 पहिले सत्र, दुपारी 12.30 ते 02.30 दुसरे सत्र आणि संध्याकाळी 4.30 ते 6.30 चे तिसरे सत्र असणार आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे, शहराचे नाव 5-6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तलाठी भरतीचे नवीन वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी 3 दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल किंवा सदरची माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की मेल आयडी जो दिलेला आहे तो, मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो आपण बरोबर दिलेला आहे की नाही याची पडताळणी अगोदरच करावी.
परीक्षा १७ ऑगस्ट पासून सुरु होणार असून विभागाकडून परीक्षेच्या ३ दिवस अगोदर प्रवेशपत्र दिले जाणार आहे ज्या उमेदवारांची परीक्षा १७ तारखेला असेल त्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार आहेत.
ईमेलवर किंवा मेसेज वर तुम्हाला प्रवेश पत्राचे इन्टिमेशन दिल्या (Talathi Bharti Hall ticket) जाईल किंवा तुम्ही संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता पण तुम्हाला तुमच्या परीक्षा कधी आहे हे कळालेच नाही तर अडचण होऊ शकते यामुळे तुमचा मोबाईल नंबर आणि मेल एकदा तपासून पहा. 19 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी कोणत्याही एका सत्रात तुमची परीक्षा टीसीएस (TCS) मार्फत घेतल्या जाणार आहे.
प्रत्येक सत्रासाठी दोन तासाचा वेळ दिला जाणार आहे. तुमचा अभ्यास आतापर्यंत झालेला असेल किंवा तुमचा अभ्यास सुरू असेल त्यासाठी लागणारे महत्त्वाचे पुस्तक आम्ही संकेतस्थळावर टाकलेले आहेत. तुम्ही ते पुस्तक वाचून 90 टक्के अभ्यास तरी करू शकता, त्यामुळे खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही पुस्तक घेऊन आत्ताच तयारीला लागू शकता.
हॉलतिकिट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तुमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे येत्या सात दिवसापासून परीक्षेला सुरुवात होईल ती 19 दिवस ही परीक्षा चालणार आहे त्यामुळे अभ्यास करून तुम्हाला परीक्षाला जायचं आहे कारण हि भरती तीन वर्षानंतर आता जाहीर झालेली आहे, त्यासोबतच या भरतीची उत्कंठा महाराष्ट्रात सर्वाधिक लागलेली होती.
भरती जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी तलाठी भरती चर्चेत राहिली आणि आता परीक्षेच्या वेळापत्रकामुळे सुद्धा तलाठी भरतीची चर्चा सर्वत्र होत आहे. आपण बाकी गोष्टीकडे लक्ष न देता व्यवस्थित अभ्यास करून तलाठी भरती पास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे.