PM Yashasvi Scholarship Scheme : भारत सरकार मार्फत यंग अचिव्हर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये 9 वी, 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी इंटर टेस्ट घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना तब्बल 01 लाख 25 हजार पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
यामध्ये नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये तर अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती भारत सरकार देणार आहे. यासाठी तुम्हाला यशस्वी इंटर टेस्ट (PM YASASVI Entrance Test-YET) पास करणं गरजेचे आहे. ही यशस्वी इंटर टेस्ट राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेतल्या जाणार आहे, यासाठी काही दिवस शिल्लक असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे संस्थेकडून सांगण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी चे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहेत सोबतच एन टी ए कडून जाहीर झालेले परिपत्रक सुद्धा जोडलेले आहे. भारत सरकारच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत ही योजना असून पीएम यंग अचिव्हर स्कॉलरशिप असे या योजनेचे नाव आहे. या योजनेमध्ये इतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी तसेच विमुक्त व भटक्या जमातीतील विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत त्यामुळे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतील याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून पाहू शकता. यशस्वी इंटर टेस्ट 29 सप्टेंबर 2023 ला शुक्रवारी घेण्यात येणार असून अडीच तासाची ही परीक्षा असेल.
याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप चे प्रश्न तुम्हाला विचारले जातील 100 प्रश्न असतील.150 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या परीक्षेसाठी दिला जाईल. इंग्रजी आणि हिंदी भाषेमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे. पेन आणि पेपर मोड त्याच्यामध्ये असेल ओ एम आर बेस (OMR) ही एक्झाम असणार आहे त्यामुळे या परीक्षेसाठी तुम्हाला आत्ताच अर्ज करायचा आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर इथे क्लिक करा
10 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 11:50 पर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे फक्त दोन दिवस बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांना खरंच पुढे चांगले शिक्षण घ्यायचा आहे आणि ज्याला खरंच आवश्यकता आहे असे विद्यार्थ्यांनी आत्ताच खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
जर तुम्ही याच्यामध्ये पास झाला तर तुम्हाला दरवर्षी 75 हजार रुपये नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना असेल आणि अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना 01 लाख 25 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती भारत सरकारकडून दिली जाणार आहे सविस्तर माहिती तुम्ही साइटवर जाऊन पाहू शकता या सोबतच खालील लिंक वरून पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करू शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही आत्ताच करू शकता.
I am 12 student
I am 11 th student, want to apply for scholarship