Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषदेमार्फत 75% अनुदानावर कडबा कुट्टी,पाणबुडी मोटर,डिझेल इंजिन, रोटाव्हेटर व पेरणी यंत्राचे वाटप सुरु, असा करा अर्ज

Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषदेतील सेस (डीबीटी) योजनेतून सन 2023-24 करिता सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% अनुदानावर तर महिला व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 75 टक्के अनुदानावर विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

यामध्ये कडबा कुट्टी, 5 एचपी पाणबुडी मोटर, डिझेल इंजिन, रोटावेटर, रोटरी टिलर/पावर टिलर, डबल पलटी नांगर, पेरणी यंत्र /कल्टीवेटर, थ्री पिस्टन स्प्रे पंप, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप, ब्रश कटर, ताडपत्री,स्लरी फिल्टर, सोलर इन्सेक्ट ट्रॅप या वस्तूचा समावेश असणार आहे.

अवजारे घेण्यासाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

या सर्व वस्तू साठी पंचायत समिती मार्फत प्रस्ताव स्वीकारली जात असूनही प्रस्ताव 20 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयाकडे टपाल विभागाकडे सादर करायचे आहेत, अपूर्ण असलेले प्रस्ताव इथे स्वीकारले जाणार नाहीत याची सदर अर्जदाराने नोंद घ्यावी.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत हे साहित्य देण्यात येत असून खाली अर्जाचा नमुना दिलेला आहे, त्या अर्जाचा नमुना भरून सदर पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे. हा अर्जाचा नमुना खाली लिंक वर उपलब्ध असून तिथून तुम्ही डाऊनलोड करून सविस्तर माहिती व्यवस्थित भरून गटविकास अधिकारी पंचायत समिती येथे सादर करायचा आहे.

अवजारे घेण्यासाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

त्यामध्ये तुम्ही मागणी करत असलेल्या अवजाराचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर वैयक्तिक माहिती लिहायची आहे, सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला (Zilla Parishad Yojana) भरायची आहे. वैयक्तिक माहिती मध्ये अर्जदारांचे आडनाव, नाव, वडील किंवा पतीचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर रहिवासाचा पत्ता जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे.

अर्जदार स्त्री आहे का पुरुष आहे याची माहिती तुम्हाला द्यायची आहे, त्यानंतर अर्जदार कोणत्या संवर्गातून येतो तिथे तुम्हाला टिक करायचा आहे. मोबाईल नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला जोडायचा आहे. अर्जदाराचा आधार कार्डशी संलग्न बँक खात्याचा तपशील आधार कार्ड क्रमांक बँकेचे नाव शाखा पत्ता खाते क्रमांक आहे एफ एस सी कोड इत्यादी माहिती भरायची आहे आणि तो अर्ज पंचायत समितीकडे सादर करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment