MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती;45000 मिळेल पगार

MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 110772 रुपये ते 172665 रुपये पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा), उपमहा व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा)आणि उप महा व्यवस्थापक (खरेदी) इत्यादी रिक्त पदांवर होणार आहे.

यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 7 फेब्रुवारी 2024 पासून ते 7 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.यामध्ये उमेदवाराला मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MRVC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार MRVC कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment