MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत फक्त 10 वी पासवर भरती; त्वरित अर्ज करा

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत तुम्ही जर नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आजच नवीन जाहिराती प्रकाशित झालेली आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महिन्याभरातून एक ते दोन भरत्या निघतच असतात.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी या भरत्या बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) होत असतात. महानगरपालिकेच्या सर्व भरत्याची माहिती आमच्याकडून वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया फक्त10 वी पास वर होणार असल्याने उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी साधून आलेली आहे,(BMC Bharti) उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत त्यामुळे तुम्ही देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी होऊ शकता.

ही भरती प्रक्रिया सपोर्ट स्टाफ या पदाकरिता होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे, उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह डीन आणि बालरोग विभाग, खोली क्रमांक 129,1ला मजला कॉलेज बिल्डीजी, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई या पत्त्यावर दिनांक 7 फेब्रुवारी 2024 ते 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवाराला दरमहा पगार 15500 देण्यात येणार आहे (MCGM Recruitment) तर या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यासोबतच कम्प्युटर नॉलेज तसेच एम एस सी आय टी कोर्स केलेला असणे देखील गरजेचे आहे.

यासाठी उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे होणार आहे उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत(BMC Job Vacancy) त्यासोबत उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा

Leave a Comment