रयत शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भरती; 817 रिक्त जागांसाठी मागवले जाणार अर्ज | Rayat Shikshan Sanstha Bharti

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत एकूण 814 रिक्त जागासाठी शिक्षण सेवक या पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही भरती माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विभागाकडील अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ प्राथमिक 06 जागा, माध्यमिक 733 जागा, उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय 55 जागा असे एकूण 814 शिक्षण सेवक स्वरूपातील नेमणूक करायचे आहेत.

शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता, पदांचा तपशील पवित्र पोर्टल व प्रसिद्ध करण्यात आला आहे व जात प्रवर्गांनुसार माहिती सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेली आहे, संपूर्ण जाहिरातीच्या तपशील तुम्ही खालील लिंक वरून डाऊनलोड करून वाचू शकता.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पवित्र पोर्टल व संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध असून या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेले शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तुम्ही धारण करत असाल तरच अर्ज ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टल द्वारे विहित कालावधीमध्ये सादर करायचे आहेत. तसेच पवित्र पोर्टल वरील सूचनेप्रमाणे आवश्यक ती कारवाई वेळोवेळी करण्यात येईल.

यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टल अंतर्गतच अपलोड करायचे आहेत. जातीनिहाय विविध पदांचा तपशील तसेच आरक्षणाचा तपशील सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेला आहे.

जाहिरात 26 जानेवारी 2024 रोजी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी काढलेली आहे संबंधित जाहिरात वरील लिंक वर उपलब्ध असून संपूर्ण जाहिरात तुम्ही वाचावे तसेच नमूद केलेल्या पवित्र पोर्टलवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही पण या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करू शकता, अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करावेत.

कागदपत्रांमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र कोणत्याही प्रवर्गातून आरक्षण घेत असाल तर त्या संबंधित जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल.

अर्ज भरते वेळेस चालू असलेला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी उमेदवाराने पोर्टलवर टाकावा जर पोर्टलवर नोंदणी केलेले नसेल तर उमेदवाराने सर्वप्रथम नोंदणी करून घ्यावी आणि त्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी सविस्तर माहिती पवित्र पोर्टलवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहे.

या दोन्हीची लिंक वर दिलेल्या लिंकवर उपलब्ध असून सविस्तर माहिती तिथून तुम्ही घेऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment