ADCC Bank Recruitment : अकोला जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेत 100 कनिष्ठ लिपिकांची भरती;पगार 28000 रुपये

ADCC Bank Recruitment 2024 : अकोला वाशिम जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये (Akola District Co-Operative Bank Recruitment) कनिष्ठ लिपिक पदावर एकूण 100 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरून 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी 26 जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 एवढा कालावधी बँकेने ठेवलेला आहे, ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.

कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र आणि निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 28 हजार रुपये एवढे मानधन बँकेकडून दिले जाणार आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 50% गुणासह पदवी धारण केलेली असणं आवश्यक आहे.

अकोला बँक लिपिक पदाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदव्युत्तर उमेदवार असतील तर त्यासाठी गुणाची टक्केवारी ग्राह्य धरल्या जाणार नाही, यासोबतच उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाचा संगणकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. ही सर्व पात्रता 31 डिसेंबर 2023 रोजी धारण केलेले असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असणं आवश्यक आहे, वयोमर्यादा पाहण्यासाठी उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे.

उमेदवार हा भारताचा नागरिक असावा तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असल्यासच अशा उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, सर्व कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस पडताळणी करून त्यानंतरच उमेदवाराला कामावर रुजू केल्या जाईल.

उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा पद्धतीने केल्या जाणार आहे 75% गुण हे ऑनलाईन परीक्षेतून होतील तर 25% गुण हे मुलाखतीसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची यादी बँक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात करणार आहे.

लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळाची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता, उमेदवारांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड होण्यासाठी कमीत कमी 50 टक्के एवढे गुण आवश्यक असणार आहे, परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत होणार असून यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा ठेवण्यात आलेली आहे.

उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत रात्री 12 वाजेच्या आत अर्ज सादर करावेत,अर्जासोबत असणारे इतर आवश्यक माहिती त्यासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्राची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचे याची सुद्धा माहिती जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे.

जाहिरात वर दिलेल्या लिंक वरून तुम्ही पाहू शकता, उमेदवाराला एक हजार रुपये एवढे परीक्षा शुल्क अर्ज करतेवेळेस ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी करून उमेदवाराला परीक्षेसाठी बोलवण्यात येईल.

त्यानंतर मुलाखत घेऊन पात्र उमेदवाराची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (ADCC Bank Recruitment 2024) प्रकाशित करण्यात येईल तुम्ही सुद्धा या भरतीसाठी इच्छुक असाल पात्र असाल तर वर दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने आत्ताच अर्ज करू शकता.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment