PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर; पहा सविस्तर माहिती

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 113 जागांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार हा 38600 ते 122800 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया 113 जागांवर होणार असून (Pune municipal corporation) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 16 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे यामध्ये SC/ST उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून ही भरती प्रक्रिया कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांकरिता एकूण 113 रिक्त जागांवर होणार आहे.यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंत असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतके अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PMC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार पुणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment