RRB Technician Bharti 2024 : भारतीय रेल्वेत 10 वी पासवर तब्बल 9000 जागांसाठी मेगा भरती !

RRB Technician Bharti 2024 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर ! भारतीय रेल्वेत तब्बल 9000 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून या भरती प्रक्रियेसाठी 10 वी पास उमेदवार तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) उत्तीर्ण  उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे यासाठी SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची सूट देखील देण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार देण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टेक्निशियन पदाकरिता 9000 जागांसाठी होणार आहे.

यामध्ये उमेदवाराची निवड ही संगणक-आधारित चाचणी I (CBT I),संगणक-आधारित चाचणी II (CBT II),दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी द्वारे होणार आहे उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून जनरल/ओबीसी/EWS साठी 500 रुपये तर SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलासाठी 250 रुपये आकारण्यात आलेले आहे.(Railway jobs) उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया मार्च / एप्रिल 2024 दरम्यान होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2024 असणार आहे. तर परीक्षा ही ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024 पर्यंत होणार आहे.

वारांसाठी महत्त्वाच्या सूचना (RRB Technician Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Railway Recruitment Board कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment