AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये मेगा भरतीची शेवटची संधी,कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखत होणार

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.

ही भरती प्रक्रिया 130 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 27450 दिला जाणार आहे, यासाठी अर्ज करणारे उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे (AIASL Recruitment)यामध्ये SC/ST उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण चेन्नई & मुंबई असून उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.तरी पात्र उमेदवारांनी चेन्नई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई ६०००४३. मुंबई : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर 5 जवळ, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई 40099 या पत्त्यावर मुलाखतीसाठी 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) या तारखेला उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क म्हणून जनरल/ओबीसी साठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे तर SC/ST/ExSM साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

ही भरती प्रक्रिया सेक्युरिटी एक्झिक्युटिव्ह पदाकरिता होणार असून शैक्षणिक पात्रताही पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (AIASL Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील सोबत ठेवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment