MBMC Bharti 2024 : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती; पगार 40000 रुपये

MBMC Bharti 2024: मीरा-भाईंदर महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 40000 व जास्तीत जास्त 80000 पर्यंत देण्यात येणार आहे, या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सार्वजनिक आरोगय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-४०१ १०१ या पत्त्यावर दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी,(Mira-Bhayandar Municipal Corporation) ही भरती प्रक्रिया पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता होणार असून यामध्ये 29 रिक्त जागा भरावयाच्या आहेत.राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल त्यामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MBMC Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यकता सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • पदांच्या संख्येत व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.
  • अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा याबाबतचे हमीपत्र देण्यात यावे.
  • अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करणे गरजेचे आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment