Navi Mumbai Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स व इतर पदांसाठी 10 वी,12वी पासवर भरती;शेवटची संधी

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता दहावी/बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.Navi Mumbai Recruitment यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पगार 17000 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील जोडायची आहेत,(Navi Mumbai Municipal Corporation) या भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असून उमेदवाराने ऑफलाइन अर्ज वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, एपिडेमियोलॉजिस्ट, फार्मासिस्ट इत्यादी रिक्त पदांवर होणार असून यासाठी 28 जागा भरायच्या आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार NMMC कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Navi Mumbai Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स व इतर पदांसाठी 10 वी,12वी पासवर भरती;शेवटची संधी”

Leave a Comment