BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; पगार 89000 रुपये दरमहा

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत तुम्ही जर नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आजच नवीन जाहिराती प्रकाशित झालेले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महिन्याभरातून एक ते दोन भरत्या निघतच असतात.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी या भरत्या बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) होत असतात. महानगरपालिकेच्या सर्व भरत्याची माहिती आमच्याकडून वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते.

तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या भरतीसाठी इच्छुक असाल तर थेट मुलाखती द्वारे ही भरती होणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला इथं भरायचे नाही आणि कोणती परीक्षा इथं नसणार आहे त्यामुळे सहजरीत्या अर्ज करून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी होऊ शकता.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी येथील रुग्णालयात तसेच नायर रुग्णालयामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराचे निवड होणार आहे.

राजावाडी रुग्णालय घाटकोपर येथे अतिदक्षता विभागात वेगवेगळ्या आठ रिक्त जागांचा समावेश असून यामध्ये हाऊसमॅन आणि प्रबंधक हे पदे भरायचे आहेत.

या पदाकरिता आवश्यक कागदपत्रासहित 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळता उमेदवारने पहिला मजला, राजावाडी रुग्णालय, घाटकोप,र मुंबई 400077 येथे उपस्थित राहायचे आहे.

हे अर्ज तुम्हाला व्यक्तिशः सादर करायचे असून मुलाखतीसाठी 15 फेब्रुवारी 2024 ला बोलावण्यात येणार आहे तसेच अधिष्ठाता नायर रुग्णालय येथे 3 रिक्त पदे भरायचे असून यासाठी शैक्षणिक अर्हता एमबीबीएस असणे गरजेचे आहे.

उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी पदे असून एम एस सी आय टी किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाने समक्षता प्रदान केलेले कोणतेही सर्टिफिकेट कोर्स असणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नायर रुग्णालयामध्ये जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर कमीत कमी वय 18 वर्षे असावे जास्तीत जास्त 45 वर्षे दरम्यान असावे येथील पदासाठी 90 हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

यासाठी अर्ज करायचा असल्यास 1 फेब्रुवारी 2024 पासून 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत नायर धर्मा रुग्णालयाच्या आवकजावक विभागात अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवाराने आपल्या सर्व शैक्षणिक मूळ कागदपत्रासह 12 फेब्रुवारी 2024 सकाळी साडेअकरा वाजता (BMC Bharti 2024) स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहायचे आहे.

तर वरील दोन्हीपैकी कोणत्याही पदांसाठी तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर सविस्तर जाहिरात पहिले वाचून घ्या आणि त्यानंतर मूळ कागदपत्रासह अर्ज सादर करावं मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहा.

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा

Leave a Comment