Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू,पगार 69000

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह पाठवायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 49910 रुपये ते 69810 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे, उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह स्वखर्चाने जायचे आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांना 600 रुपये आणि SC, ST आणि महिला उमेदवारांना 100 रुपये आकारण्यात आलेली आहे.

भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाहीत.या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. यासह, उमेदवारास आर्मी/नेव्ही/एअर फोर्समधील कमिशन्ड सेवेचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया मॅनेजर सिक्युरिटी पदाकरिता संपूर्ण भारतभर होणार असून एकूण 38 रिक्त जागा भरायच्या आहेत, उमेदवारांनी ऑनलाईन दिलेल्या लिंक वरून 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bank of Baroda Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील सोबत ठेवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment