JSPM Pune Recruitment 2024 : JSPM पुणे येथे 604 जागांसाठी भरतीची शेवटची संधी !

JSPM Pune Recruitment 2024 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे (jspm college pune) येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 604 जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 15 जानेवारी 2024 पासून पंधरा दिवसात संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (कॉर्पोरेट कार्यालय), ‘सावंत कॉर्नर’ एस. क्रमांक ८४/२ई/१/५, कात्रज चौक, कात्रज, पुणे- ४६ या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल इत्यादी पदांकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (JSPM Pune Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्वाधिकार jspm college pune कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment