IIG Mumbai Bharti 2024 : 8वी,10वी,12वी पासवर IIG मुंबई येथे सरकारी नोकरी ! चालक, शिपाई व इतर पदांवर भरती

IIG Mumbai Bharti 2024 : IIG मुंबई येथे विविध पदांवर सरकारी नोकरीची संधी ! मुंबई येथे (भारतीय चुंबकत्व संस्था) मध्ये विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी 8वी,10वी,12वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदावर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून तसेच ऑफलाईन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर सादर करायची आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 30 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे,या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 4 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करायचे आहे तर अर्जाची हार्ड कॉपी 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजिस्टार कार्यालय, भारतीय चुंबकत्व संस्थान, प्लॉट नंबर 5, सेक्टर 18, कलंबोली हाईवे, न्यू पनवेल, नवी मुंबई 410218 महाराष्ट्र येथे पाठवायची आहे.

ही भरती प्रक्रिया चालक, शिपाई/मल्टी टास्किंग स्टाफ,प्रोफेसर ई, फेलो, तांत्रिक अधिकारी-III, तांत्रिक अधिकारी-I, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II इत्यादी रिक्त पदांवर होणार आहे..

यासाठी अर्ज शुल्क सामान्य/अनारक्षित/ओबीसी/इडब्ल्यूएस व इतर पदांकरिता ८०० रुपये करण्यात आलेले आहे तर महिला/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक यांना 300 रुपये अर्ज शुल्क आकारलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IIG Mumbai Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment