मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल भरती; 2632 उमेदवारांची निवड यादी जाहीर | Bombay High Court Shortlist 2023

Bombay High Court Shipai/Hamal Bharti 2023 : मध्ये मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शिपाई व हमाल पदांच्या भरतीची अल्पसुची जाहीर झाली असून या (Bombay high court shortlist 2023)अल्पसुचीमध्ये एकूण 2632 उमेदवारांकडून पडताळणीसाठी कागदपत्रे मागवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी आलेली असून ही यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक करून पाहू शकता जर तुम्ही अर्ज केलेला असेल शिपाई/हमाल पदासाठी तुमचं नाव त्यात आहे का एकदा चेक करा.

त्यात जर नाव असेल तर 29 जानेवारी 2024 पूर्वी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे प्रबंधक (कार्मिक), उच्च न्यायालय, अपिल शाखा, 5  वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी रुग्णालयावर, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-400001 येथे फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत.

संपूर्ण यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्राच्या स्व-साक्षांकीत केलेल्या म्हणजे स्वतःच्या सही च्या डॉक्युमेंट्स तुम्हाला वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायच्या आहेत स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर (BHC Shipai Bharti 2023) कोणत्या माध्यमातून डॉक्युमेंट पाठवू नये ते डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाहीत.

याच्यात कोणत्याही निर्देशाचे पालन जर उमेदवारांनी केलं नाही तर त्याची निवड होऊ शकणार नाही. केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवाराची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

खालील नमूद केलेले यादीतील उमेदवाराने खालील कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत ज्यामध्ये ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांक सहित, जन्मतारखेचा पुरावाचा दाखला ज्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीच्या बोर्डाचे प्रमाणपत्र असेल.

शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी पास चे गुणपत्रक त्यानंतर दहावी बारावी किंवा इतर परीक्षा पास केल्या असतील तर त्याच्या गुणपत्रक, जातीचा दाखला, नावात बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र सोबत जोडणे आवश्यक असेल.

संपूर्ण यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दस्तऐवज पाठवते वेळेस तुम्हाला (Bombay High Court Shipai/Hamal Bharti 2023) शिपाई व हमाल पदाकरिता अर्ज असं व्यवस्थित लिफाफ्यावर लिहिणे गरजेचे आहे ही जाहिरात 21 मार्च 2023 ला निघालेली होती त्यानुसार 2632 उमेदवाराची शॉर्टलिस्ट लागलेली आहे.

ज्यांचे नाव लिस्टमध्ये आहे अश्या उमेदवारांना इथे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येत आहे, मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल पदाकरिता 21 मार्च 2023 खंड 6 नुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्प सूची करण्यात आलेली आहे.

पहिल्या पाच हजार उमेदवार नंतरचे (Bombay High Court Shortlist 2023) पुढील अल्प सूची 2632 उमेदवाराकडून त्याची शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी मागवण्यात येत आहेत, यानंतरचे अपडेट उच्च न्यायालयाकडून सर्व कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांना कळेल.

हा फायनल निकाल नसून फक्त अल्पसूची उच्च न्यायालयाने तयार केलेली आहे जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडूनच कागदपत्र पडताळणीसाठी मागवण्यात येत आहेत,सर्व साक्षांकित कागदपत्र उमेदवारांनी पाठवावे कोणतेही ओरिजनल कागदपत्र उमेदवारांनी इकडे पाठवू नये.

नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment