Bank Bharti 2024 : लिपिक,शिपाई,ड्रॉयव्हर,वॉचमन पदांसाठी 7 वी ते 10 वी पासवर भरती;ऑनलाईन अर्ज करा

Bank Bharti 2024 : पश्चिम महाराष्ट्रातला 5000 कोटीच्या व्यवस्थापूर्ती कडे वाटचाल करणाऱ्या एका अग्रगण्य शेडूल सहकारी बँकेत वेगवेगळ्या पदावर भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून खालील दिलेले पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती मध्ये लिपिक, शिपाई, वाहनचालक तसेच सुरक्षारक्षक या पदांचा समावेश आहे कमीत कमी सातवी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

  • लिपिक –  मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, एम एस सी आय टी ,बी कॉम, MBA तसेच इतर मान्यता प्राप्त संस्थेचे बँकिंग सहकार व कार्य विषयक पदविका.
  • शिपाई – किमान दहावी उत्तीर्ण
  • वाहन चालक – किमान आठवी उत्तीर्ण व चारचाकि किंवा NT/TR चालवण्यासाठी परवाना आवश्यक.
  • सुरक्षारक्षक – सातवी उत्तीर्ण

वयोमर्यादा

वर दिलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून संपूर्णपणे वाचावी त्यानंतरच वयोमर्यादेत बसत असेल तर अर्ज करावा.

पदांचा तपशील

  • लिपिक – 140 जागा
  • शिपाई – 49 जागा
  • वाहन चालक – 04 जागा
  • सुरक्षा रक्षक – 49 जागा

नोकरीचे ठिकाण – सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई व तिची उपनगरे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पगार

इच्छुक पात्र तसेच निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या नियमाप्रमाणे मानधन देय असेल.

निवड पद्धत (Bank Bharti 2024)

परीक्षा सदर पदासाठी 100 गुणांची बहू पर्यायी प्रश्नांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल या परीक्षेमध्ये 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील, त्यानंतर त्या परीक्षेत पास झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी होईल आणि मुलाखत घेतल्या जाईल मुलाखत झाल्यानंतर उमेदवाराचे अंतिम निवड केल्या जाणार आहे.

परीक्षा शुल्क

परीक्षा शुल्क 1000+18% जीएसटी असे एकूण 1180 रुपये अर्ज सादर करताना ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.

उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळा उपलब्ध हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून अडीअडचणीचे शंकाचे निरसन करता येईल.

वर दिलेल्या सगळ्या पदांची सविस्तर माहिती जाहिरात मध्ये दिलेले आहे अर्ज करण्याची पद्धत सुद्धा जाहिरातीमध्ये सांगितलेले आहे तुम्ही या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर सर्वप्रथम जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करू शकता.

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment