प्रतीक्षा संपली !! तलाठी भरतीची अंतिम निवड यादी जाहीर;पहा कोण-कोण झाले तलाठी | Talathi Final Merit List

Talathi Final Merit List : 2023 मध्ये झालेली आणि सर्वाधिक गाजलेल्या तलाठी भरतीचा निकाल महाभूमी कडून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आला,लाखो उमेदवार या निकालची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे, खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हाला यादी डाउनलोड करता येईल.

अशा अनेक अडचणीमुळे तलाठी भरतीच्या निकालाला खूप उशीर झाला होता तब्बल आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते मात्र टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम पूर्ण झाले आणि आज निकाल प्रसिद्ध करण्यात आला.

2023 तलाठी भरती अंतिम निवड यादी जाहीर झाली असून खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही जिल्हानिहाय यादी डाउनलोड करू शकता.

अंतिम निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितली होती.

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते, अंतिम छाननी नंतर 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज महसूल विभागाकडे प्राप्त झाले होते, त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातल्या तीन सत्रात घेण्याचं निश्चित करण्यात आल होता. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही आक्षेप व हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती.

अंतिम निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नापैकी 2831 प्रश्नावर 16 हजार 205 अर्जदारांनी आक्षेप नोंदवले आहेत (Talathi Final Merit List) या आक्षेपपैकी एकूण वैध 146 प्रश्नासाठी घेतलेले 9072 आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत.

दरम्यान परीक्षेत एकूण 5700 प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9072 आक्षेप टीसीएस कंपनी ग्राह्य धरले त्यानुसार 146 च्या प्रश्नामध्ये दुरुस्ती केल्या आहेत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबत असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली.

2023 तलाठी अंतिम निवड यादी जाहीर झाली असून खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही जिल्हानिहाय यादी डाउनलोड करू शकता.

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment