ZP Result 2023 : जिल्हा परिषद भरती 2023 चा निकाल जाहीर; जिल्ह्यानुसार यादी पहा

ZP Result 2023 : 2023 मध्ये तलाठी भरती, ग्रामसेवक भरती याच्यासोबतच जिल्हा परिषदेची सुद्धा वेगवेगळ्या पदावर भरती जाहीर झाली होती, ऑगस्ट 2023 मध्ये या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस मार्फत अर्ज मागविण्यात आले होते.

विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला होता. जिल्हा परिषदेमार्फत मोठी भरती ऑगस्ट मध्ये राबवण्यात आली होती ही भरती गट क संवर्गातील विविध पदासाठी घेण्यात आली होती, या भरतीच्या निकालाचे चाहूल सर्व अर्जदारांना लागली असेल.

ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हा परिषदेच्या परीक्षा सुद्धा पार पडल्या होत्या या परीक्षानंतर आज जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे, महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदेचा निकाल (Maharashtra ZP Result 2023) त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर झालेला असून हा निकाल तुम्ही वेबसाईटवर जाऊन जिल्ह्यानुसार पाहू शकता.

जिल्हा परिषद भरती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या जिल्हा परिषद भरती मध्ये वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व वरिष्ठ लिपिक या पदांचा निकाल जाहीर झालेला आहे.

हा निकाल जिल्हा परिषद अमरावती, जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा परिषद रायगड, जिल्हा परिषद रत्नागिरी इत्यादी जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे व नमूद केलेल्या सर्व पदांचा तसेच जिल्हा परिषदेचा निकाल आज लागण्याची शक्यता सूत्राने वर्तवली आहे.

जरी तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही परीक्षा दिली असेल तर सदर वेबसाईटवर जाऊन तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद भरती चा निकाल प्रसिद्ध होण्याची कालपासून सुरुवात झालेली आहे आणि काल आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात येत असून खाली दिलेल्या जिल्ह्याचे निकाल आतापर्यंत लागलेले आहेत.

ज्यामध्ये जिल्हा परिषद पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, अहमदनगर,सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्हा परिषदेचा समावेश आहे. वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर (ZP Result 2023) जाऊन तुम्ही जिल्ह्यानुसार तुमचा निकाल पाहू शकता.

निकाल आयबीपीएस च्या पॅटर्ननुसार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण त्याची यादी जिल्हा नुसार प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, बाकीचे जे पद राहिलेले आहेत त्या पदाचा निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे.

जिल्हा परिषद भरती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आज/उद्या मध्ये हा निकाल सुद्धा लागण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही वारंवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज भरला आहे त्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती पाहू शकता.

वेगवेगळ्या नोकरीच्या संधी तसेच वेगवेगळ्या निकाल या विषयाची माहिती आमच्या संकेतस्थळावर तत्परतेने प्रसिद्ध करण्यात येते तुम्हाला ही माहिती लगेच मिळावी यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा किंवा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन सुद्धा तुम्ही ही माहिती मिळवू शकता.

तुम्हाला संपूर्ण पीडीएफ डाउनलोड (Download ZP Result 2023) करायची असेल तर वरची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता तिथून जाहीर झालेल्या निकालाची पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता.

व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment