ISRO NRSC Recruitment 2024 : इस्रोमध्ये 10 वी पासवर सरकारी नोकरी ! नर्स व इतर पदासाठी भरती सुरु

ISRO NRSC Recruitment 2024 :भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रोमध्ये) विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (ISRO Recruitment) सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 65,554 ते 81,906 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 फेब्रुवारी 2024 रोजी, 18 ते 35 वर्षे सूट असणे आवश्यक आहे, यामध्ये एससी/एसटी 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया 41 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये नर्स ‘B’,ग्रंथालय सहाय्यक ‘A’ ,वैद्यकीय अधिकारी ‘SC’,शास्त्रज्ञ/अभियंता SC इत्यादी पदांचा समावेश असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क 750 रुपये आकरण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ISRO NRSC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच 12 फेब्रुवारी 2024 नंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकारी ISRO कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment