GMC Recruitment 2024 : गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 7 वी ते 10 वी पासवर सरकारी नोकरी;शेवटची संधी

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 3 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया गट डी पदाकरिता होणार असून यामध्ये प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी,शवविच्छेदन परिचर,प्राणी गृह परिचर,दप्तरी,परिचर,सफाईगार,शिंपी,दंत परिचर,उदवाहन चालक,वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट, वाहक, न्हावी, धोबी,चौकीदार,प्रयोगशाळा परिचर,माळी,कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया,बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी,सहायक स्वयंपाकी,स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 7वी, 8वी ते 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, यामध्ये 137 रिक्त जागा भरायच्या असून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 15000 ते 63200 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (GMC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • पोस्टाने/कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार GMC Dhule कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment