Oil India Limited Recruitment 2024 : ऑइल इंडिया लि.मध्ये 10वी, 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी ! 420+ रिक्त जागा

Oil India Limited Recruitment 2024 : ऑइल इंडिया लि.मध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी बारावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे, ही भरती प्रक्रिया 421 जागांसाठी होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 26000 व जास्तीत जास्त 127000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून (Oil India) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असावे तसेच SC/ST उमेदवारांना 05 वर्षे तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10वी/12वी परीक्षा उत्तीर्ण /आयटीआय/बी.एस्सी/बी.ए. असणे आवश्यक आहे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये आकारण्यात आलेले आहेत तर SC/ST/EWS/PWD/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही.

उमेदवारांनी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत ही भरती प्रक्रिया ग्रेड-III/V या पदाकरिता होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Oil India Limited Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, तसेच अर्धवट कागदपत्रांसह आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment