PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 65 रिक्त पदांसाठी भरती;लवकर अर्ज करा

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फर सोसायटी अंतर्गत विविध 65 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी दर बुधवारी खालील नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत.

तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित झेरॉक्स, फोटो आणि मूळ शैक्षणिक कागद प्रमाणपत्रासह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

यामध्ये विविध सात पदांचा समावेश असून एकूण 65 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध दवाखान्यामध्ये रिक्त जागा उपलब्ध असून त्यासाठी ही भरती आयोजित करण्यात येणार आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरती संदर्भातील सर्व अटी व शर्ती आणि मिळणारे मानधन याची माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता,अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक/मानसिकदृष्ट्या सक्षम असवा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणत्या गुन्हा किंवा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

जाहिरातीमध्ये नमूद केलेले शिक्षण किंवा पात्रता धारण केलेली असल्यासच उमेदवाराने मुलाखतीला हजर राहावे उमेदवाराची निवड करते वेळेस 50 गुणांच्या गुणांकनाप्रमाणे उमेदवाराची निवड केल्या जाईल त्याचा तपशील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

मुलाखतीला जाते वेळेस उमेदवाराने शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा किंवा जन्म तारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रमाणित केलेली शासकीय निमस शासकीय अनुभव प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र वगैरे सादर करणे आवश्यक असेल.

या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून (PCMC Recruitment 2024) पात्र आणि इच्छुक उमेदवारांची मुलाखत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी 411018 येथे आठवड्यातील दर बुधवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे.

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या कागदपत्रासह वर दिलेल्या पत्त्यावर सकाळी 11 वाजता उपस्थित राहणे बंधनकारक असेल, अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये त्याच्या सोयीनुसार ठिकाण बदलून मिळणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भविष्यात एखाद्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास प्रतिक्षा यादीतील किंवा मेरिटमधील पुढच्या उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न करता नियमानुसार नियुक्ती आदेश दिले जातील.

सदर निवड यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल, भरतीच्या सर्व सूचना त्याचा सविस्तर तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच खालील लिंकवर सुद्धा उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध केली असून जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना सुद्धा उपलब्ध आहे इच्छुक उमेदवाराने जाहिरात पूर्ण वाचून अर्जाचा नमुना व्यवस्थित  भरून दर बुधवारी सकाळी 11 वाजता वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment