MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी भरती; 50000 रुपये पगार

MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, उमेदवारांनी सविस्तर भरलेला अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005 या पत्त्यावर 31 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी आवश्यक  सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 45000 व जास्तीत जास्त 50000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे तसेच यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी जास्तीत जास्त 61 वर्षापर्यंत असावे,ही भरती प्रक्रिया सह संचालक,सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी,सेवानिवृत्त ACP, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक इत्यादी पदांवर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे यामध्ये कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MSF Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑफलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment