ESIC Pune Recruitment 2024 : ESIC पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरतीला सुरुवात; थेट मुलाखत होणार

ESIC Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज 29 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37 या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 67700 ते 159334 पर्यंत  पदानुसार देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 45 वर्षे जास्तीत जास्त 67 वर्षापर्यंत असावे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी या पदाकरिता होणार असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी 29 जानेवारी 2024 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ESIC Pune Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्धतीने 29 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार ESIC Pune कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment