Aurangabad Mahanagarpalika Bharti : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेत नोकरीची संधी ! कोणतीही फी नाही

Aurangabad Mahanagarpalika Bharti : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी पात्र उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 17000 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यामध्ये नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असून उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, मनपाचे मुख्यालय, आरोग्य विभाग, टाऊन हॉल, छत्रपती संभाजीनगर या पत्त्यावर 25 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी बारावी उत्तीर्ण तसेच एमबीबीएसएमडी (मेडिसिन)बीएएमएसबीएचएमएस,बी एससी आणि ओटी असिस्टंट कोर्स असणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया फिजिशियन, आयुष वैद्यकीय अधिकारी, ईसीजी तंत्रज्ञ आणि ऑक्सिजन तंत्रज्ञ इत्यादी रिक्त पदांवर होणार असून (Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Mahanagarpalika) यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावे.

ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) साठी होणार आहे, (NHM Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Recruitment) यामध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणाऱ असून सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Aurangabad Mahanagarpalika Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Sambhaji Nagar Municipal Corporation कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment