RRB ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत फक्त 10 वी पासवर तब्बल 5,696 रिक्त जागांसाठी लोको पायलट पदाकरिता मेगा भरती

RRB ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत फक्त दहावी पास वर तब्बल 5,696 रिक्त जागांसाठी असिस्टंट लोको पायलट पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 20 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून (Loco Pilot Bharti 2024) यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण +ITI पास असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे, यासाठी पात्र उमेदवारांना दरमहा पगार हा 19900 पर्यंत दिला जाणार आहे.

ही भरती असिस्टंट लोको पायलट पदाकरिता होणार असून यामध्ये मागासवर्गीयांना 250 रुपये तर इतर प्रवर्गासाठी 500 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (RRB ALP Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Railway Recruitment Board कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “RRB ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत फक्त 10 वी पासवर तब्बल 5,696 रिक्त जागांसाठी लोको पायलट पदाकरिता मेगा भरती”

Leave a Comment