Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महानगरपालिकेत 117 जागांवर 12 वी पासवर थेट मुलाखतीद्वारे भरतीची शेवटची संधी

Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी पास ते पदवी पर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी/अर्ज शुल्क भरायची आवश्यकता नाही,(Thane Mahanagarpalika Recruitment) ही भरती प्रक्रिया 117 रिक्त जागांसाठी होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी पदानुसार आपले अर्ज सादर करायचे आहेत, उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 25 हजारापर्यंत दिला जाणार आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे यामध्ये मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा दिलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक क्ष-किरण तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ, अल्ट्रासोनोग्राफी/सी.टी.स्कॅन तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ, एंडोस्कोपी तंत्रज्ञ इत्यादी रिक्त पदांवर होणार असून यासाठी मुलाखतीची तारीख ही 19 जानेवारी 2024 असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Thane Municipal Corporation Recruitment)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • अर्धवट माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार ठाणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment