मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी ! कोणतीही फी नाही | Mira Bhayandar Municipal Corporation Bharti

Mira Bhayandar Municipal Corporation Bharti : मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,नगरभवन,मांडली तलाव,तळ मजला,भाईंदर (पं). ता. जिल्हा. ठाणे -401101 अर्ज या पत्त्यावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मीरा-भाईंदर असून उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी,(Mira-Bhayandar Municipal Corporation) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,फिजिशियन,नेत्ररोग तज्ञ,त्वचारोग तज्ञ,इएनटी तज्ञ,मानसोपचार तज्ञ इत्यादी पदांचा समावेश असून समावेश असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (Mira Bhayandar Municipal Corporation Bharti)

 • वयाचा पुरावा – जन्म दाखला /शाळा सोडल्याचा पुरावा.
 • पदवी/ पदवीका गुणपत्रिका व प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र
 • शासकीय किंवा निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
 • पॅन कार्ड
 • सध्याचा फोटो
 • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
 • फौजदारी गुन्हा दाखल झाले नसल्याचे हमीपत्र
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी सविस्तर अर्ज करताना स्वतःचे संपूर्ण नाव शाळा प्रमाप्रमाणेच अचूकपणे भरायचे आहे.
 • अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी, जन्मतारीख माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद केलेलीच असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ब्रह्मणध्वनी क्रमांक व वैध ई-मेल आयडी नमूद करणे बंधनकारक राहील.
 • अर्धवट असलेले अर्ज नाकारण्यात येतील, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment