Ganesh Mandal Permission : गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार

Ganesh Mandal Permission : बाप्पाचे आगमन येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे बाप्पाच्या आगमनाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात त्यातल्या त्यात गणेश मंडळाची धावपळ सुद्धा बाप्पा येईपर्यंत चाललेली असते यासाठी महाराष्ट्रातील मोठमोठ्या महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

पुणे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका यासारख्या महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याचे सुरू केले आहे, महानगरपालिकेने आजच जाहीर निवेदन काढून ज्यांना नोंदणी करायचे आहे त्यांच्यासाठी एक खिडकी पद्धत लागू केलेली आहे.

गणेशोत्सव मंडळाने अर्ज भरण्याची वन विंडो कार्यपद्धती एक ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार असून गणेशोत्सव मंडळाने आवाहन करण्यात येत होते की 01 ऑगस्ट पासून गणेशोत्सव मंडळ प्रतिवर्षाप्रमाणे संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे मंडळांना पोलीस वाहतूक पोलीस वा अग्निशमन यांच्याकडे परवानगीसाठी वेगवेगळे जाण्याची गरज पडणार नाही, सन 2023 करिता मंडळांना परवानगीसाठी शुल्क भरणे आवश्यक नसणार आहे मंडप परवानगी (Ganesh Mandal Permission) सुद्धा निशुल्क देण्यात येणार आहे फक्त 1000 एवढी सुरक्षा अनामत रक्कम महानगरपालिकेकडे जमा करायचे आहेत.

मागील वर्षी ज्या मंडळांना परवानगी दिली होती त्या मंडळाच्या अर्ज मागील वर्ष प्रमाणेच असल्यास यावर्षी ऑनलाईन पद्धतीचा स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस शाखेकडे न पाठवता मागील वर्षाच्या परवानगीच्या आधारे त्वरित परवानगी देण्यात येईल परंतु त्यासाठी मागील वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये न चुकता नमूद करणं आवश्यक राहील.

गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

01 ऑगस्ट 2023 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी संगणकीय कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर अर्जदार विहित कालावधीत कुठून कधीही अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेले आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता ऑनलाइन पद्धतीने मंडळाने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर 2023 संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत असेल कोणत्या अडचणी बाबत संबंधित सहाय्यक आयुक्त यांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल.

यावर्षी देखील म्हणताना हमीपत्र देणे बंधनकारक आहे ऑनलाईन प्रणालीतून हे आम्ही पत्र डाऊनलोड करता येणार आहे त्यावर संबंधितांच्या सह्या करून ते अर्ज सहित अपलोड करायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

बाप्पाच्या आगमनाची शोभा वाढवविण्यासाठी आम्ही तयार आहोत !!

वर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा

Leave a Comment