GMC Nagpur Recruitment : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 10 वी पासवर 680 जागांसाठी भरती सुरू

GMC Nagpur Recruitment : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया गट डी (ग्रेड 4) पदाकरिता एकूण 680 जागांसाठी होणार असून या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 47600 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे आवश्यक आहे (Government Medical College Nagpur) तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 30 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.यासाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (GMC Nagpur Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 20 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment