Government jobs : 10 वी आणि 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी ! त्वरित करा इथे अर्ज

Government jobs : 10 वी/12वी पास उमेदवारांसाठी विधानसभेत विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये सुरक्षारक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर ,ऑफिस अटेंडंट ही पदे भरण्यात येणार आहेत,(Vidhansabha Recruitment) या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 जानेवारीपासून 2024 पासून सुरू होणार असून उमेदवारांनी अर्ज 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी/बारावी पास किंवा समक्ष असणे आवश्यक आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 37 वर्षापर्यंत असावे. यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 18500 ते 81100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

यामध्ये अर्ज शुल्क ऑफिस अटेंडंट पदांसाठी 400 रुपये, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 600 रुपये आणि सुरक्षा रक्षकांसाठी 675 रुपये  आकारलेले आहे, उमेदवारांनी पदानुसार अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Government jobs)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

3 thoughts on “Government jobs : 10 वी आणि 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी ! त्वरित करा इथे अर्ज”

Leave a Comment