VVCMC Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये या पदासाठी नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा

VVCMC Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिका, पालघरमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक पात्र व उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 10 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पालघर असून यासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे,   (Vasai Virar Municipal Corporation) उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर-401305 या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचा आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया विशेष कार्यकारी अधिकारी पदावर होणार असून यासाठीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत,(VVCMC Bharti 2024) यामध्ये अर्ज करणारा उमेदवार शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक ती क्षमता असणे गरजेचे आहे.

उमेदवाराने अर्जामध्ये सेवानिवृत्त आदेशाची छायाचित्र प्रत व कामकाजाचा अनुभव, राहण्याचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी नमूद करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात कोऱ्या कागदावर सुवाच्च अक्षरात लिहावा अथवा टंकलिखित करावा.

प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचा अधिकार आयुक्त प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका यांना राहतील. उमेदवाराने सदर पदाकरिता अर्ज जाहिरातीच्या दिनांक पासून आठ दिवसाच्या आत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार या पत्त्यावर पोहोचेल अशा रीतीने पोस्टाने पाठवावा. विहित दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

5 thoughts on “VVCMC Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये या पदासाठी नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा”

Leave a Comment