Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

Bombay High Court Bharti 2024 : बॉम्बे उच्च न्यायालयात विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना दरमहा पगार 144840 ते 194660 पर्यंत दरमहा दिला जाणार आहे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 09 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे, यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया जिल्हा न्यायाधीश पदाकरिता होणार असून (Bombay High Court Bharti) यासाठी शैक्षणिक पात्रता कायद्यातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bombay High Court Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment