Railway jobs 2024 : रेल्वेत 10 वी पासवर विविध पदांसाठी 1646 नवीन जागांसाठी भरतीला सुरुवात..

Railway jobs : उत्तर पश्चिम रेल्वेत 1646 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 10 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 1646 जागांवर होणार असून (North Western Railway Bharti 2024) यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण तसेच ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असावे तसेच SC/ST उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे, यामध्ये परीक्षा शुल्क जनरल/ओबीसी 100 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकरण्यात आलेले नाही.

यामध्ये पगार निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा नियमाप्रमाणे दिला जाईल, यासाठी नोकरीचे ठिकाण अजमेर, बिकानेर,जयपुर आणि जोधपुर असणार आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच खाली दिलेल्या लिंक वरून 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Railway jobs 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment