Post Office Bharti 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती,10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी ; 63000 पगार

Post Office Bharti 2024 : डाक विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ! भारतीय पोस्ट खात्यात नेहमीच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असते, फक्त 10 वी पासवर ही भरती प्रक्रिया निघालेली आहे.

ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभागाकडून राबवली जात असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 19900 ते 63200 पर्यंत देण्यात येणार आहे. यामध्ये अर्ज शुल्क म्हणून फक्त 100 रुपये भरायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नोंदणी प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन करायची आहे. तर अर्जाची हाड कॉपी खाली दिलेल्या पत्त्यावर 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायची आहे

यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्यासोबतच Driving Licens तसेच हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ड्रायव्हर (साधारण ग्रेड) या पदाकरिता होणार असून यामध्ये 78 रिक्त जागा भरायच्या आहेत, पोस्ट विभागातील उत्तर प्रदेश वर्तुळात ही भरती आयोजित केली आहे. यासाठी उमेदवाराने ऑफलाईन अर्ज व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सेवा कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर- 208001 उत्तर प्रदेश या पत्त्यावर 16 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायच्या आहेत.

यामध्ये उमेदवाराची निवड प्रक्रिया ही स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment