Talathi Bharti Result 2023 : बहुचर्चित तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर;जिल्ह्यांनुसार यादी डाउनलोड करा

Talathi Bharti Result 2023 : 2023 मध्ये सर्वाधिक गाजलेल्या तलाठी भरती चा निकाल (Merit List) जाहीर झालेला आहे या निकालामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra Talathi Recruitment 2023 Result) संपूर्ण जिल्ह्याचे गुणवत्ता यादी महाभूमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपल्या जिल्ह्यानुसार तुम्ही यादी डाऊनलोड करून त्याविषयीची सविस्तर माहिती पाहू शकता.

जानेवारीच्या अखेरपर्यंत निकाल लागेल अशी माहिती राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली होती टीसीएस चे युद्ध पातळीवर निकाल देण्यासाठी प्रयत्न चालू होत्या काल तलाठी भरती चा निकाल प्रसिद्ध झाला असून तब्बल आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

जिल्ह्यानुसार निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरपूर कारणामुळे ही तलाठी प्रक्रिया गाजली आणि तलाठी भरती चा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा तलाठी परीक्षेवर विविध प्रश्नचिन्हे उभे आहेत एक स्वर आलेल्या माहितीनुसार काही अर्जदारांना ठराविक गुणांपेक्षा जास्त गुण या परीक्षेमध्ये दाखवण्याचे काम टीसीएस ने केले आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून पाहू शकता आणि पुढील प्रक्रियेसाठी तयार राहू शकता.

तलाठी भरतीच्या (Talathi Bharti Result 2023) परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते, अंतिम छाननी नंतर 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज महसूल विभागाकडे प्राप्त झाले होते, त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातल्या तीन सत्रात घेण्याचं निश्चित करण्यात आल होता. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही आक्षेप व हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती.

जिल्ह्यानुसार निकाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नापैकी 2831 प्रश्नावर 16 हजार 205 अर्जदारांनी आक्षेप नोंदवले आहेत या आक्षेपपैकी एकूण वैध 146 प्रश्नासाठी घेतलेले 9072 आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत.

दरम्यान परीक्षेत एकूण 5700 प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9072 आक्षेप टीसीएस कंपनी ग्राह्य धरले त्यानुसार 146 च्या प्रश्नामध्ये दुरुस्ती केल्या आहेत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबत असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली.

2023 तलाठी भरती (Talathi Bharti Result 2023) गुणवत्ता यादी जाहीर झाली असून खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही जिल्हानिहाय यादी डाउनलोड करू शकता

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment