MGNREGA Bharti 2024 : मनरेगा अंतर्गत पालघर येथे विविध पदांसाठी फक्त 10 वी पासवर भरती सुरू, कोणतीही फी नाही

MGNREGA Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पालघर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (MGNREGA) दहावी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल, या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पालघर (महाराष्ट्र) असणार आहे उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग या पत्त्यावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 100 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये संसाधन व्यक्ती या पदाकरिता ही भरती निघालेली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MGNREGA Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार MGNREGA कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment