NCCS Pune Bharti 2024 : पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू | कोणतीही फी नाही

NCCS Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 20000 व जास्तीत जास्त 56000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिनांक 29 आणि 30 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 आणि 30 जानेवारी 2024 रोजी 35 ते 50 वर्षापर्यंत असावे 

ही भरती प्रक्रिया प्रयोगशाळा व्यवस्थापक, तांत्रिक-लॅब असोसिएट, पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I इत्यादी पदांवर होणार असून या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे, उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NCCS Pune Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार National Centre For Cell Science Pune कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment