Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment : या महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! थेट मुलाखत होणार

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नवीन प्रशासकिय इमारत, 6 वा मजला, वैद्यकिय आरोग्य विभाग भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे या पत्त्यावर  या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी (प्रत्येक गुरुवारी) उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 30000 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया मायक्रोबायोलॉजिस्ट (MD),दंतवैद्य, प्रसूतितज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ञ, सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ इत्यादी पदांकरिता होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण भिवंडी,ठाणे असणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे, उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Bhiwandi Nizampur City Municipal Corporation कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment