KVK Recruitment : कृषी विज्ञान केंद्रात शिपाई व इतर पदांसाठी भरती सुरू | पगार 35,000 पर्यंत

KVK Recruitment : कृषी विज्ञान केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 9000 व जास्तीत जास्त 35000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, जि. गोंदिया या पत्त्यावर दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमी 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. SC/ST/NT – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट देखील देण्यात आलेली आहे.यासाठी नोकरीचे ठिकाण गोंदिया (महाराष्ट्र) असणार आहे, यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी पास तसेच  एम.एस्सी. ऍग्री. (वनस्पती पॅथॉलॉजी) ,ऍग्री. डिपोलम + MS-CIT इत्यादी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (KVK Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारच्या भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

3 thoughts on “KVK Recruitment : कृषी विज्ञान केंद्रात शिपाई व इतर पदांसाठी भरती सुरू | पगार 35,000 पर्यंत”

Leave a Comment