Mumbai Mahanagarpalika Bharti : मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरू | इथे पहा सविस्तर माहिती

Mumbai Mahanagarpalika Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 15 जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार 1 लाख रुपये पर्यंत देण्यात येणार आहे,(Brihanmumbai Municipal Corporation) यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008 या पत्त्यावर 15 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून ही भरती प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक या पदावर होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता MD/MS/DNB (प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग) असणे आवश्यक आहे, या भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे, उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mumbai Mahanagarpalika Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “Mumbai Mahanagarpalika Bharti : मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरू | इथे पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment