Jilhadhikari Karyalaya Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वी पासवर 745 जागांसाठी भरती सुरू

Jilhadhikari Karyalaya Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात 745 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत,यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया पोलीस पाटील पदाकरिता होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण नांदेड असणार आहे. (Jilhadhikari Karyalaya nanded bharti)यासाठी उमेदवाराला अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 700 रुपये इतके आकारण्यात आलेले आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 1 जानेवारी 2024 पासून ते 8 जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

यासाठी निवड प्रक्रिया ही चाचणी परीक्षा द्वारे होणार आहे (Nanded Police Patil Recruitment) यासाठीची सविस्तर माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरातीमध्ये वाचावी, ही भरती प्रक्रिया नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदाकरिता होणार असून उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या लिंक करून सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी परीक्षेचे अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, (Maharashtra Government Jobs) इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाही, सदर ऑनलाईन अर्ज दिनांक 8 जानेवारी 2024 पर्यंत सायंकाळी 11:59 पर्यंत सादर करायचे आहेत.

भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण व आरक्षण प्रवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिया संदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना राखून ठेवलेले असून त्यांचा निर्णय अंतिम असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्जदार हा संबंधित गावचा व कायम रहिवासी असावा, अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment