Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती;त्वरित अर्ज करा

Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 57000 ते 144200 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे तर यासाठीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी ऑफलाईन अर्जाची हार्ड कॉपी 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007 या पत्त्यावर सादर करायची आहेत तर ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 01 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती 111 रिक्त जागांसाठी होणार असून (Pune University) यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Pune University Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून तर ऑफलाइन अर्जाची कॉपी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायची आहे.
  • दिलेल्यातारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी कोणतेही प्रकारच्या भत्ता दिला जाणार नाही, त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • तसेच उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहे.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment