कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे फक्त 4 थी पासवर भरतीची शेवटची संधी | Family Court Mumbai Recruitment

Family Court Mumbai Recruitment : कौटुंबिक न्यायालय मुंबई या कार्यालयाच्या स्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.यामध्ये उमेदवाराचे शिक्षण फक्त चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज कौटुंबिक न्यायालय, मुंबई नविन प्रशासकीय इमारत, बी-विंग, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई 400051 पूर्णकालिक या पत्त्यावर दिनांक 22 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील,अर्जाचा नमुना, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 15610 रुपये देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी ते 30 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.ही भरती सफाई कामगार पदासाठी होणार असून उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवायचे आहेत किंवा समक्ष आणून द्यायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Family Court Mumbai Recruitment)

  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच लिफाफ्यावर पूर्ण कालिकपद्धतीने सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • तसेच पोस्टद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.
  • या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शरीर प्रकृती सुदृढ असावी.
  • पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असावी.
  • उमेदवारांनी अर्जासोबत फक्त जन्मतारखेच्या प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेलाव दहा रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक आहे.
व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment