SSC GD Constable Recruitment : कर्मचारी निवड आयोगातर्फे 10 वी पासवर तब्बल 26146 पदांची मेगा भरती !

SSC GD Constable Recruitment : कर्मचारी चयन आयोग अंतर्गत तब्बल 26146 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) रायफलमन (सामान्य कर्तव्य) या पदाकरता होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण/ मॅट्रिक उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 21700 ते 69100 पर्यंत दिला जाणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 23 वर्षापर्यंत असावे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून 24 नोव्हेंबर 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क म्हणजेच फी भरण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2024 असणार आहे,यामध्ये उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.(SSC Recruitment) या भरती प्रक्रियेसाठी संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक फेब्रुवारी 2024 दरम्यान असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SSC GD Constable Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment