MPCB Recruitment : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरू

MPCB Mumbai Recruitment : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून (MPCB Recruitment) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 29 डिसेंबर 2023 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असून यामध्ये प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 19900 ते २,08,700 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे यामध्ये मागासवर्गीयांना 05 वर्षाची शिथिलता देखील देण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया 64 रिक्त जागांसाठी होणार असून उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय/अनाथ यांना 900 रुपये व दिव्यांग/माझी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज 19 जानेवारी 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MPCB Recruitment )

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment