तलाठी भरतीचा निकाल “या” दिवशी लागणार;राज्य समन्वयक सरिता नरके यांची माहिती | Talathi Bharti Result

Talathi Bharti Result : 2023 मध्ये सर्वाधिक गाजलेल्या तलाठी भरती चा निकाल जानेवारीअखेरपर्यंत येऊ शकते असे अधिकृत सूत्रांकडून कळाले आहे, बहुचर्चित अशा तलाठी भरती परीक्षेतल्या 2831 प्रश्नावर 16205 अर्जदारांकडून आक्षेप आलेले आहेत व  146 प्रश्नांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

अशा अनेक अडचणीमुळे तलाठी भरतीच्या निकालाला खूप उशीर होत आहे तब्बल आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध पातळीवर आणखी सुद्धा सुरू आहे.

तलाठी भरती चा निकाल या ठिकाणी पाहता येईल

जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितले आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते, अंतिम छाननी नंतर 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज महसूल विभागाकडे प्राप्त झाले होते, त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातल्या तीन सत्रात घेण्याचं निश्चित करण्यात आल होता. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर सूचीबाबत काही आक्षेप व हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती.

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नापैकी 2831 प्रश्नावर 16 हजार 205 अर्जदारांनी आक्षेप नोंदवले आहेत या आक्षेपपैकी एकूण वैध 146 प्रश्नासाठी घेतलेले 9072 आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले आहेत.

तलाठी भरती चा निकाल या ठिकाणी पाहता येईल

दरम्यान परीक्षेत एकूण 5700 प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9072 आक्षेप टीसीएस कंपनी ग्राह्य धरले त्यानुसार 146 च्या प्रश्नामध्ये दुरुस्ती केल्या आहेत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबत असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली.

मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला (Talathi Bharti Result) विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली निकालाबाबत बहुतांश काम पूर्ण होत आले आहे.

गुणवत्ता यादी तयार करणे व जिल्ह्यानुसार निकाल जाहीर करण्याचे काम सुरू असल्याचे नरकेने सांगितले आहे, त्यामुळे जानेवारीच्या शेवटपर्यंत तलाठी भरती चा निकाल लागणे अपेक्षित आहे.

2023 तलाठी भरती चा निकाल पाहण्यासाठी वर लिंक दिलेली आहे ज्यावेळेस निकाल जाहीर होईल त्यावेळेस त्या लिंक वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता याबाबतची सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे ते सुद्धा माहिती तुम्ही लिंक द्वारे डाऊनलोड करून पूर्ण वाचू शकता.

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment